महानगरपालिकेचे `योद्धे’ कोरोना विषाणूचा पराभव करून सुखरूप घरी परतले!
मुंबई ( मोहन सावंत यांजकडून):- दादर पूर्व येथील दादासाहेब फाळके रोडवरील शिवनेरी बिल्डिंग समोर गौतम नगर परिसरात मुंबई महानगरपालिका कर्मचारी वसाहत आहे. येथे राहाणारे बधुं भगिनी महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात काम करतात. (उदा. आरोग्य विभाग, साफसफाई विभाग, सुरक्षा विभाग) त्यांचा कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष संबंध येतो. तरीही न घाबरता ते मोठ्या धैर्याने आपले काम प्रामाणिक आणि कार्यक्षमतेने करीत असतात. जनतेच्या सेवेला प्राधान्य देत हे कर्मचारी निष्टेने कार्य करताना त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा आजाराला सामोरं जावं लागलं आणि दोन दिवसापूर्वी ते सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय रोगमुक्त होऊन पुन्हा आपल्या घरी सुखरूप आले. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून परमात्मा त्यांना सदृढ आरोग्यासह उदंड आयुष्य देवो; अशी प्रार्थना त्यांच्या मित्रपरिवाराने केली आहे.