शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत
कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असो आणि `द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक’चा विधायक उपक्रम
मुंबई:- कोरोना विषाणू महामारीच्या पाश्वभूमीवर मुंबईत नागरिकांना ताजा भाजीपाला मिळणे दुरापास्त झाले आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन जोगेश्वरी पाटलीपुत्र येथील कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सोसायटी असोशियन, पाटलीपुत्र नगर, ओशिवरा, जोगेश्वरी (प) मुंबई आणि द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक यांनी संयुक्तरित्या विधायक-स्त्युत्य उपक्रम यशस्वीपणे राबविला. ह्या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वप्रकाराची ताजी भाजी थेट कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असोशियनच्या सदस्य ग्राहकांना माफक दरात देण्यात आली.
शेतकऱ्यांना दिलासा आणि ग्राहकांची सोय-
कोरोना विषाणू महामारीच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांची भाजी ग्राहकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वप्रकाराची ताजी भाजी घेऊन नाशिक, पुणे, नवीमुंबई, मुंबईसारख्या महानगरात ग्राहकापर्यंत माफक दारात पोहचविली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. तर शेतकऱ्यांची थेट शेतातील भाजी दारात आल्याने आजच्या आणीबाणीच्या परिस्थितीत ग्राहकांची सोय झाली. ह्याबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कोरोना विषाणू आजाराच्या पाश्वभूमीवर पूर्णपणे काळजी घेण्यात आली होती.
सदर विधायक उपक्रम राबविण्यासाठी कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असो.चे सरचिटणीस मोहन सावंत, अध्यक्ष प्रमोद मेंडन, खजिनदार मुख्तार अहमद तसेच द्राक्ष विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत बनकर, हर्षद बनकर व सहकारी यांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. तर श्रीमती नेहा गुप्ता,चेतन नाईक, संदिप तोरसकर, समीर शनीश्चर यांनी सुदंर नियोजन केले. सदर उपक्रमाला अनेक महिला, वयोवृद्ध नागरिकांनी शुभेच्छा आशिर्वाद दिले.