गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्लात १६ जवान शहीद

गडचिरोली:- लोकसभेच्या निवडणुकीत गडचिरोलीतील मतदारांनी दाखविलेला उत्साह आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात सी- ६० पथकाने यापुर्वी केलेली धडक कारवाई पाहून आज महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी डाव साधला. गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी- ६० पथकाचे १६ जवान शहीद झाले आहेत. आज सकाळी सकाळी साडे अकराच्या सुमारास सी- ६० पथकाचे जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर जवानांचे खासगी वाहन आले असता नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटाअगोदर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काही काळ चकमक झाल्याचेही सांगितले जात आहे. या हल्ल्यामुळे देशात खळबळ उडाली आहे.

तत्पूर्वी नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील दानापूर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालय जाळल्याची घटना काल रात्री अकरा ते तीन वाजताच्या सुमारास घडली. या वेळी माओवाद्यांनी च्रक, जेसीबी, ट्रॅक्टरसह ३० पेक्षा अधिक वाहने जाळली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.

You cannot copy content of this page