श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आयोजित २१ एप्रिल २०१९ रोजी महारक्तदान शिबीर

२०१८ पर्यंत १ लाख, ४५ हजार, ९२ एवढे युनिट (बाटल्या) रक्तदान

मुंबई:- दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीदेखील श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन ह्या संस्थेने रविवार दि. २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत महारक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp) आयोजित केलेले आहे.

सद्‌गुरू श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार गेली २१ वर्षे ही संस्था रक्तदान शिबीर (ब्लड डोनेशन कॅम्प) नियमितपणे आयोजित करत आहे व त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना ह्या रक्तदान शिबीरांचा फायदा होतो आहे.

आतापर्यंत म्हणजे सन १९९९ ते २०१८ पर्यंत श्रद्धावानांनी मुंबई व महाराष्ट्रात मिळून आयोजित केल्या गेलेल्या रक्तदान शिबीरात एकूण “१,४५,०९२” एवढे युनिट रक्तदान झाले आहे व त्यातील महारक्तदान शिबिरांचे योगदान “६३,०२६” युनिट एवढे आहे.

सदगुरु श्रीअनिरुद्धांनी प्रत्यक्षमधील तुलसीपत्र अग्रलेखमालिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे, ” केवळ स्वयंभगवान त्रिविक्रमाला आवडते म्हणून खर्‍याखुर्‍या गरजू श्रद्धावानांना सहाय्य करणे हे देखील भक्तिभाव चैतन्यच “.आणि म्हणूनच आपला रक्तदान शिबिरातील सहभाग हे देखील भक्तिभाव चैतन्यामध्ये राहणेच आहे.

You cannot copy content of this page