स्व. सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

तळेरे (संजय खानविलकर):- स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट व स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय, तळेरे यांच्यावतीने स्व.सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

यानिमित्त शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१ सकाळी ९:३० वा रक्तदान शिबीरचे आयोजन विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे करण्यात आले. तसेच स.१०:०० वा. इयत्ता १० वी व १२ वी विद्यार्थी व आकाश कंदील स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

तसेच श्री. विठ्ठल मंदिर तळेरे गावठण येथे श्री.खर्जादेवी दुध उत्पादक संस्था आणि ज्येष्ठ नागरिक संघ तळेरे यांच्यावतीने ११.०० वा. दुग्ध व्यवसाय व शेती विषयक मार्गदर्शन होणार असून यासाठी प्रा. भास्कर काजरेकर (शेती) , डाॅ.देसाई (दुग्ध व्यवसाय) बहुमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे.यानतंर दु.१.०० वा. विशेष प्रविण्य प्राप्त विद्यार्थी समाजसेवी व्यक्तींचा सत्कार सोहळ्यासह सहभोजन होणार आहे.या कार्यक्रमासाठी नितिन तळेकर-दारुम, राजू वळंजू , डाॅ.अभिजित कणसे, विनय पावसकर याचे विशेष सहकार्य लाभले असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट व स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय, तळेरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.