`आम्ही कणकवलीकर…’ २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहणार आणि संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेणार!

कणकवली:- भारताची आर्थिक राजधानीत मुंबईवरील दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला होता. त्याला तेरा वर्षे झाली. २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी आणि राज्यघटना दिनानिमित्त संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेण्यासाठी पोलीस ठाणे कणकवली येथे उद्या सायंकाळी साडेसहा वाजता कणकवलीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन `आम्ही कणकवलीकर……’ च्या माध्यमातून सन्मानिय श्री. डॉ. सुहास पावसकर, सन्मानिय श्री. विनायक(बाळू) मेस्त्री, सन्मानिय श्री. अशोक करंबेळकर यांनी केले आहे. त्यावेळी प्रत्येकाने स्वतः आणलेली मेणबत्ती पेटवून ह्या कार्यक्रमात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवायचा आहे.

You cannot copy content of this page