पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२१
सोमवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष दशमी ३० नोव्हेंबरच्या पहाटे ०४ वाजून १३ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- उत्तरा फाल्गुनी रात्री २१ वाजून ४१ मिनिटांपर्यंत
योग- प्रीति ३० नोव्हेंबरच्या उत्तररात्री ०२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत
करण १- बालव सायंकाळी १६ वाजून ५७ मिनिटांपर्यंत
करण २- विष्टि ३० नोव्हेंबरच्या पहाटे ०४ वाजून १३ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- कन्या अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५६ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५७ मिनिटांनी होईल
चंद्रोदय- उत्तररात्री ०१ वाजून ३६ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १४ वाजून २० मिनिटांनी
भरती- सकाळी ०६ वाजून ५६ मिनिटांनी आणि रात्री २० वाजून ०२ मिनिटांनी
ओहोटी- उत्तररात्री ०० वाजून २६ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून ५० मिनिटांनी
राहुकाळ- सकाळी ०८ वाजून १७ मिनिटांपासून ते सकाळी ०९ वाजून ४१ मिनिटांपर्यंत आहे.
दिनविशेष:-
२९ नोव्हेंबरच्या महत्वाच्या घटना….
इ.स. १९९९ मध्ये जगातील सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बीण अशी ओळख असलेला जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा (GMRT) शुभारंभ झाला.
इ.स. २०११ मध्ये आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका इंदिरा गोस्वामी यांचे निधन झाले.