सामाजिक कार्याच्या शुभारंभासाठी सानिका मोहन सावंत यांना विधिज्ञ निर्मलाताई प्रभावळकर यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई- मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय अर्बन सेलच्या अध्यक्षा, तळागाळातील गरीब कष्टकरी जनतेचे प्रश्न जाणणाऱ्या सामाजिक आणि धडाडीच्या नेत्या विधिज्ञ निर्मला सामंत-प्रभावळकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन डॉ. सानिका मोहन सावंत यांनी सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शन घेतले. त्यावेळी निर्मलाताई डॉ. सानिका सावंत यांना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. त्यावेळी डॉ. सानिका यांचे वडील मोहन सावंत उपस्थित होते.
राजकारणामध्ये प्रामाणिक, कार्यक्षम आणि विश्वासू नेतृत्व म्हणून विधिज्ञ निर्मला सामंत-प्रभावळकर यांची ओळख आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या १९९४ साली मुंबईच्या महापौर झाल्या. पेशानं वकील असलेल्या निर्मला सामंत-प्रभावळकर यांची ओळख सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाण असणाऱ्या महापौर अशी होती. कुशाग्र बुद्धिवादी असलेल्या- सामान्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या विधिज्ञ निर्मलाताई प्रभावळकर राजकारणात असूनही खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांना नागरी समस्यांचा चांगला अभ्यास आहे. महिलांचे प्रश्न त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडलेत. राजकीय कार्य असो वा सामाजिक कार्य; सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या काम करतात; अशी त्यांची ख्याती आहे.
अशा आदर्शवादी व्यक्तिमत्वाचे आशीर्वाद घेऊन सामाजिक कार्याचा शुभारंभ करण्यासाठी डॉ. सानिका सावंत यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ. सानिका सावंत यांच्याशी संवाद साधत अनेक विषयावर मार्गदर्शन केले. “आई वडिलांच्या सुसंस्काराने तू घडली आहेस. शासकीय सेवेत राहून सामाजिक बांधिलकी कशी जोपासता येते? हे तुझ्या वडिलांनी दाखवून दिले आहे. शिक्षिका असणाऱ्या आईने तुला सुसंस्कार दिले. त्यासाठी आईवडिलांनी खूप काबाडकष्ट केले आहेत. ही जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी स्वीकारण्यास आता तू सज्ज झालेली आहेस. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव असतील.” असे उदगार विधिज्ञ निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी डॉ. सानिका यांच्याशी बोलताना काढले आणि डॉ. सानिकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.