आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरात साजरा

देवगड:- महात्मा गांधी विद्या मंदिर तळेबाजार व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस हायस्कूलमध्ये उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हा उपाध्यक्ष नंदन अंकुश घोगळे यांनी मानव व मानवाचे अधिकार समजावून सांगितले व मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शिक्षक अजित कदम ,महादेव चव्हाण, सुशील जोईल व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page