पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक १६ डिसेंबर २०२१

गुरुवार दिनांक १६ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष शुक्लपक्ष त्रयोदशी १७ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत
नक्षत्र- भरणी सकाळी ०७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत
योग- शिव सकाळी ७ वाजून १६ मिनिटांपर्यंत

करण १- कौलव दुपारी १५ वाजून १९ मिनिटांपर्यंत
करण २- तैतिल १७ डिसेंबररच्या पहाटे ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मेष दुपारी १४ वाजून १९ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ०७ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०२ मिनिटांनी

चंद्रोदय- सायंकाळी १६ वाजता
चंद्रास्त- पहाटे ०४ वाजून ३३ मिनिटांनी

भरती- सकाळी ०९ वाजून ५८ मिनिटांनी आणि रात्री २३ वाजून ०९ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ०४ वाजून २६ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून २१ मिनिटांनी

राहुकाळ- दुपारी ०१ वाजून ५७ मिनिटांपासून ते दुपारी ०३ वाजून १९ मिनिटांपर्यंत

————
दिनविशेष: – आज आहे बांगलादेश विजय दिन.
बांगलादेश मुक्ति युद्ध पाकिस्तानच्या विरोधात भारताला १९७१ साली करावे लागले. त्या युद्धात पाक सैन्याने भारतासमोर शरणागती पत्करली आणि १६ डिसेंबर १९७१ रोजी हे युद्ध संपले व बांग्लादेश स्वतंत्र झाला.

हास्यसम्राट नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज स्मृती दिन. त्यांचे निधन २००४ साली झाले. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शेकडो मराठी हिंदी चित्रपटात काम केले.