सिंधुदुर्गात पहिल्यांदाच बंदिस्त शेळीपालनाचे मोफत मार्गदर्शन शिबीर होणार
तळेरे:- कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रातील आवड असणाऱ्या तरुणांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कारागीर ऍग्रो या सिंधुदुर्गातील कृषी आणि पूरक क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेने ‘बंदिस्त शेळीपालन’ या विषयावरील मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. हे शिबिर 6 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 2 या वेळेत श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे होणार आहे.
हे शिबीर सर्वांसाठी खुले असून याचा जास्तीत जास्त तरुणांनी तसेच शेळीपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कारागीर ऍग्रो चे संस्थापक अमित दळवी यांनी केले आहे. या मोफत मार्गदर्शन शिबिराला मार्गदर्शक म्हणून सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कृषी उद्योजक आणि शेळीपालक सुमित भोसले उपस्थित राहणार आहे. हे प्रशिक्षण श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव,तालुका-मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे होणार आहे. कृषी आणि कृषीपुरक व्यवसायातून जिल्ह्यातील घराघरात समृध्दी येण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी सुरुवातीला हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणीसाठी कारागीर ऍग्रो च्या फेसबूक ला भेट द्या किंवा अमित दळवी 9137916183, गितेश परब 7448080124, सर्वेश दळवी 9326530700 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कारागीर ऍग्रो कडून करण्यात आले आहे. कारागीर ऍग्रो ही शेती आणि शेतीपूरक उद्योगांच्या विषयावर शेतकऱ्यांना सज्ञान करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून करत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अमित दळवी यांनी केले आहे.