सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित
एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर मालवण येथे संपन्न
उत्तम कामगिरी बद्दल जिल्हा संघटना प्रथम क्रमांकाने सन्मानित
मालवण:- सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने सर्वोत्कृष्ट कार्य करून जिल्हाध्यक्ष संतोष नाईक आणि जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानिमित्ताने जिल्हा संघटनेला प्रथम क्रमांकाने सन्मानित करून गौरविण्यात आले.
नुकतेच जिल्ह्यातील ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर स.का. पाटील महाविद्यालय मालवण याठिकाणी संपन्न झाले. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या उत्तम कामगिरी बद्दल जिल्हा संघटनेला प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह देण्यात आले. या मार्गदर्शन शिबिराला संघटनेचे राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर, महाराष्ट्र राज्य सचिव संतोष शेटे, महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम, पुणे ऑफिस प्रमुख राकेश शिंदे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भारतरत्न कै. लता मंगेशकर व सिंधुदुर्गातील दशावतारी राजा कै.सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर यांनी संघटनेचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच संघटन वाढीचे कौशल्य व प्रत्येकाने कसे काम करावे? याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांनी शंकांचे निरसन केले. जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा सादर केला.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम कामगिरी केली जात असल्याने त्याची राज्य स्तरावरती दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेला पहिल्या क्रमांकाचा बहुमान मिळाला. त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग टिमचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर व राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या हस्ते देण्यात आले.
या शिबिराला जिल्हा उपाध्यक्ष नारायण कुबल, जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, संघटक मंदार काणे तसेच मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, कणकवली तालुकाध्यक्ष हनिफभाई पिरखान, कुडाळ तालुकाध्यक्ष डॉ.अरुण गोडकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर त्याचप्रमाणे मालवण कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर, कुडाळ कार्याध्यक्ष डॉ. वैभव आईर, पळसब सरपंच व मालवण तालुका संघटक चंद्रकांत गोलतकर, माजी सावंतवाडी तालुका अध्यक्ष अमेय मोरे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष प्रभुखानोलकर यांनी केले. तर शेवटी आभार सुरेश धुरी यांनी मानले.