क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न – कणकवलीत तीव्र निषेध!
सिंधुदुर्ग क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाची कणकवलीत बैठक : सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर
कणकवली:- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या मुंबई, परळ येथील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी स्वप्निक फाटक याने चुकीच्या पद्धतीने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री प्रयत्न केला. या घटनेच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञाती बांधवांनी गंभीर दखल घेत त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.
मुंबई येथील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या आवारात येऊन स्वप्निक फाटकने विश्वस्तांच्या कार्यालयाला व डॉ. शिरोडकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिकेच्या कार्यालयाला कुलूप घालून सीसीटीव्ही यंत्रणेचे नुकसान केले आणि विश्वस्त, सुकाणू व कार्यकारिणीचे नामफलक काढून टाकून त्याऐवजी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचे नाव लिहून त्याखाली अध्यक्ष म्हणून आमदार प्रसाद लाड, सेक्रेटरी म्हणून स्वतःचे व विश्वस्त म्हणून इतर तीन जणांची नावे असलेला फलक लावला. ह्याबाबत समाज बांधवांनी संतप्त तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या मुंबई, परळ येथील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी घडलेल्या घटनेबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर चर्चा करत समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. वैयक्तिक असलेले मतभेद बाजूला ठेऊन शिक्षणमहर्षी डॉ. रामचंद्र शिरोडकर, शिक्षण तज्ञ एच.डी. गावकर, प्रि. आर.आर.लोके यांच्यासह समाजातील विविध मंडळींनी समाज संस्था उभारण्यास आपले आयुष्य खर्ची घातले व शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करून बहुजन समाजातील असंख्य विद्यार्थी घडविले आहेत. समाज संस्थेचे स्थान अबाधित ठेवण्याचे काम आपल्या समाज बांधवांचे आहे. संस्थेच्या घटनेनुसार क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेत गावडे- गावडा जातीचीच व्यक्ती सभासद होऊ शकते; असे असताना जाती बाहेरची व्यक्ती अध्यक्ष कशी होऊ शकते? बाहेरच्या व्यक्तीला अशाप्रकारे अध्यक्षपदी आणण्याचा डाव कोणी मांडला? गेल्या तेरा वर्षातील समाज संस्थेच्या कारभाराबाबतही काही गंभीर प्रश्न समाज बांधवांनी उपस्थित केले. ह्याबाबत सविस्तर चर्चा करून बैठकीत समाज संस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सतर्क राहण्याचे ठरले.


ह्यासंदर्भात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचे विश्वस्त समिती, सुकाणू समिती व पदाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय एकमुखी घेण्यात आला. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो ज्ञाती बांधव सहभागी होतील. त्यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय ह्या बैठकीत घेण्यात आला.


ह्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्यादृष्टीने जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी सिंधुदुर्ग क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित राहून आपापली मते मांडली. सभेच्या प्रारंभी भगवान लोके यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधवांना एकत्र आणून समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजासमोरील प्रश्न जाणून घेणे आणि ते मार्गी लावण्यासाठी आगामी काळातील प्रयत्न आवश्यक आहेत, त्यासाठी समाजाची संघटना मजबुतीने काम करण्याच्यादृष्टीने चर्चा करावी, असे सुचित केले. त्यानुसार चर्चा होऊन संघटनात्मक बांधणी करण्याचे ठरले.

यावेळी संजय रावले, अनिल साळगावकर,सचिन लोके, शरद घाटये, आदेश ओटवकर, मिलिंद परब, कमलेश नरे, रवींद्र नरे, संजय विखाळे, अमित तोडणकर, मंगेश धोपटे, भरत चव्हाण, जयराम डामरे, सुनिल हरमलकर, रमेश चिंदरकर, लक्ष्मण मसुरकर, विजय चिंदरकर, प्रणव नरे, विजय हडकर, जयानंद फाटक,सुनील हरमलकर, गुरुदास चिंदरकर आदींसह जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सिंधुदुर्ग क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली.
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज जिल्हा कार्यकारिणी

जिल्हाध्यक्ष- रामदास विखाळे
सचिव- भगवान लोके
उपाध्यक्ष- गणेश गावकर, रविंद्र जोगल, आप्पा चव्हाण
सहसचिव- हनुमंत वाळके
सदस्य- आतिष जेठे, साईनाथ ओटवकर, स्वप्निल चिंदरकर, चंद्रकांत डामरे, उत्तम लोके, मिलिंद परब, सचिन आचरेकर, विजय चिंदरकर, अनिल नरे, गणेश नेवाळकर, चंदन गावकर
हेही वाचा!
हेही वाचा!
क्षा. म. समाज डॉ. शिरोडकर हायस्कुलच्या जनरल रजिस्टरमध्ये बेकायदेशीरपणे नोंद बदल?
हेही वाचा!
संपादकीय… क्षा. म. समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारलेल्या सैतानी परंपरेचा नाश व्हायलाच पाहिजे!










