नवनिर्माण करण्यासाठी हाताचा उपयोग करा! – राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते रमेश हेगाणे

राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय एकात्मता सायकल रॅलीचे कणकवलीत स्वागत

कणकवली:- “युवा वर्गाने आपल्या हाताचा उपयोग चांगल्या कामासाठी करून राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावावा. राष्ट्र उभारणीसाठी युवा वर्गात संस्कार,क्रीयाशिलता आणि श्रमाची आवश्यकता आहे.युवाईने या विचारांची कृती करण्याचा प्रयत्न करून देशाची एकात्मता आबाधित ठेवण्यासाठी सक्रिय व्हावे!” असे प्रतिपादन सांगली येथील राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते रमेश हेगाणे यांनी गोपुरी आश्रमात राष्ट्र सेवा दलाच्या सायकल रॅली च्या स्वागताच्या वेळी युवकांसमोर बोलताना केले.

राष्ट्र सेवा दल गेली ७५ वर्षे सातत्याने हा विचार तरूणाईत रूजवण्याचा प्रयत्न करत आहे. हा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा यासाठी साने गुरुजी प्रतिष्टान आणि राष्ट्रसेवादल,मिरज जिल्हा, सांगली यांच्या वतीने गेली १९ वर्षे सायकल रॅलीचे आयोजन केले जाते.

यावेळी गोपुरी आश्रमाचे अद्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, राष्ट्र सेवा दल, मिरजचे जेष्ठ सदस्य सदाशिव मगदूम, दिनकर आदाटे, डॉ.शांत, प्रा.विनया चनगुंडी, जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी, गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे, संचालक अर्पिता मुंबरकर, अमोल भोगले, सहव्यवस्थाप बाळकृष्ण सांवत, सदाशिव राणे, नितीन जावळे,राष्ट्र सेवा दल शाखा कणकवलीच्या सरिता पवार, सिद्धी वरवडेकर,पल्लवी कोंकणी आदि मान्यवर उपस्थित होते.

११ नोव्हेंबर २०१८ रोजी सांगली मिरज येथून निघालेली ही सायकल रॅली अदमापूर,फोंडा, कणकवली,मालवण, कुणकेश्वर, वैभववाडी, गगनबावडा,मिरज असे ४६० कि.मी.अतर पार करत दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ रोजी मिरजेत परत जाणार आहे. या रॅलीत नागरिकांचे राष्ट्रीय एकात्मता संवर्धनाविषयी संस्कार गीते, घोषणा,चर्चा या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे.

यावेळी रॅलीत वय वर्षे १० ते ८६ या वयातील राष्ट्र सेवादलाचे सैनिक सहभागी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवलीचा नितांत चव्हान हा सातवीत शिकणारा सैनिक सहभागी झाला.आहे.

यावेळी सहभागी सैनिकांमधून प्रा.विनया चनगुंडी, सोनाली चौगुले यांनी रॅलीतील सहभागाविषयी आपले अनुभव सांगितले. कणकवली शाखेच्या सिद्धी वरवडेकर आणि पल्लवी कोकणी यांनी कणकवली शाखेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वाचन संस्कृती विकास ऊपक्रमाची माहिती सहभागिंना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे हद्द आणि आभार डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनी मानले.या रॅलीचे स्वागत करण्यासाठी कणकवली राष्ट्र सेवा दल शाखेचे कार्यकर्ते व गोपुरी आश्रमाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *