विद्यार्थ्यांनी व्यायामातून आरोग्यसंपन्न शरीरयष्टी प्राप्त करण्याचे राज्यपालांचे आवाहन
मुंबई:- विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा व व्यायाम यावर लक्ष केंद्रीत करुन आरोग्यसंपन्न शरीरयष्टी प्राप्त करावी, असे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी सांगितले. श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या ४५व्या वार्षिक क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ दादर येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात क्रीडा क्षेत्रात गुणवंत संपन्न विद्यार्थी असून त्यांना योग्य प्रशिक्षण व साधन सुविधाची आवश्यकता असते. श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना आपल्या कला गुणांना विकसित करता आले, असेही राज्यपाल यांनी सांगितले.
यावेळी श्री समर्थ व्यायाम मंदिरचे अध्यक्ष अनंत भापेकर, कार्यवाहक उदय देशपांडे,विश्वस्त पद्मजा फेणाणी, दिलीप साठे तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.