डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात श्रीकृष्ण जन्म व कालाष्टमी उत्सव साजरा होणार!
मुंबई:- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्म व कालाष्टमी उत्सव २३ व २४ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई परेल येथील डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्या मंगलप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबईचे सरचिटणीस श्रीकृष्ण दाजी हंजनकर, सहचिटणीस सुरबा बाबाजी मुंबरकर, उपचिटणीस अनिल तुकाराम कोठारकर यांनी केले आहे.

					
					
					
					
					
					









