सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे १२ ऑगस्टपर्यंत धावणार नाही…
मुंबई:- लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशा स्थितीतच रेल्वेकडून १२ ऑगस्टपर्यंत अत्यावश्यक लोकल सेवा व स्पेशल ट्रेन व्यतिरिक्त रेल्वेची प्रवासी सेवा सुरु होणार नसल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना रेल्वेप्रवास करता येणार नाही. पॅसेंजर, मेल एक्स्प्रेस आणि उपनगरीय रेल्वे गाड्या १२ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून रेल्वेची सामान्य सेवा बंद आहे. सर्व नियमित वेळापत्रकानुसार धावण्यात येणाऱ्या गाड्यांचे बुकिंग रद्द केले असून बुकिंगचा पूर्ण रिफंड प्रवाशांना दिला जाणार आहे.