कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती पदी श्री. प्रकाश पारकर यांची निवड
कणकवली, २५:- पंचायत समितीच्या उपसभापती पदी नामवंत भजनी बुवा आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी श्री. प्रकाश पारकर यांची निवड झाली असून त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. कणकवली पत्रकार मित्रांच्यावतीनेही त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, जेष्ठ पत्रकार साहित्यिक अजय कांडर, माजी अध्यक्ष संतोष राऊळ, उमेश बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते.