कणकवली आणि तरळेचा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत बंद
कणकवली (संतोष नाईक):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कणकवलीचा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आणि तर तळेरे ग्रा .पं. च्या वतीने आज ही घोषणा केली.
जिल्ह्यधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अंमलबजावणी करताना कणकवली शहरात आठवडा बाजाराच्या दिवशी लागणारी रस्त्यावरील दुकाने लावता येणार नाहीत. मात्र बाजारातील दुकाने सुरु राहतील. आठवडा बाजाराच्या दिवशी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते, ती गर्दी टाळण्यासाठी वरीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार असून नियम मोडल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेने आठवडा बाजारासाठी कणकवलीत गर्दी करू नये आणि मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे आदी नियमांचे पालन करावे; असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे.
आठवडा बाजार भरणार नसल्याची सूचना लाऊडस्पीकर अनाऊन्समेंट द्वारे तळेरे ग्रा .पं. च्या वतीने आज करण्यात आली. नागरिक व्यापारी यांनी शारीरिक अंतर ठेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, ग्रामसेवक युवराज बोराडे व सर्व ग्रा.पं.सदस्यांनी केले आहे.