कुरळप लैंगिक अत्याचार प्रकरणी ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या तक्रारीची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल

सांगली (संतोष नाईक):- कुरळप ता. वाळवा जि. सांगली येथील मिनाई आश्रम शाळेच्या संस्थापकानेच आठ मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ह्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. एम. डी. चौधरी यांनी पीडित मुलींना न्याय मिळण्यासाठी तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्य मानवी हक्क आयोगाचे न्यायमूर्ती श्री. सईद साहेब यांच्या न्यायालयात, महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, सांगली जिल्हाधिकारी, सांगली पोलीस प्रमुख यांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत.

या घटनेचा पाठपुरावा राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, राष्ट्रीय प्रवक्ता संतोष कदम, पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी प्रशांत कदम, सांगली जिल्हा अध्यक्ष दीपक भोसले, पलूस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील, वाळवा तालुका सचिव प्रशांत पाटील, सांगली जिल्हा जनसंपर्क अधिकारी शशिकांत कांबळे व संघटनेचे पदाधिकारी व सभासद करत आहेत.

सदरच्या प्रकरणात पीडित मुलींना व त्यांच्या कुटुंबियांना लवकरच न्याय मिळेल; अशी अपेक्षा ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. एम. डी. चौधरी साहेब यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page