महामारीविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज!
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक)- जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना कोविड रुग्णांसाठी सर्व उपचार जिल्ह्यात योग्यप्रकारे मिळावेत म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला क्रियाशील केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजुलक्ष्मी यांनी केली. त्यावेळी पोलीस अधीक्षक श्री. राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रजित नायर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी संबंधित कामाचा आढावा घेण्यात आला.
त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये जिल्हाधिकारी श्रीम. के मंजुलक्ष्मी यांनी व्यक्तिशः भेट दिली आणि रुग्णालयातील डॉक्टर्सशी चर्चा केली व रूग्णसेवा व सुविधांचा आढावा घेतला.