सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांच्याकडून नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याचे वाटप
कणकवली (प्रतिनिधी):- सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पाण्याचे वाटप केले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी आणि औषधोपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तेथे येणाऱ्यांना शुद्ध पाणी देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी स्वखर्चाने पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स वाटले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिक्षा वाळके, एस. एस. ठाणेकर, व्ही. आर. पवार, शिक्षण विभागाचे शिक्षक बाळकृष्ण सावंत, ज्ञानदेव आटनीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाना चांगली सेवा मिळते. लसीकरण मोहीमही उत्कृष्ट पद्धतीने सुरु असून सर्व रुग्णाची योग्य ती तपासणी करून औषधोपचार केले जातात; परंतु रिक्त असलेल्या पदांमुळे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ताण पडतो. त्यामुळे नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदांची त्वरित नेमणूक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.