तिलारी नदी धोका पातळीवर, कर्ली, वाघोटनने ओलांडली इशारा पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.):– आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 43.600 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 10 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 9.600 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.