उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार २६ ऑगस्ट २०२१
गुरुवार दिनांक २६ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- ४
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष चतुर्थी १७ वा. १३ मि.
नक्षत्र- रेवती २२ वा. २८ मि.
योग- गंड २७ ऑगस्टच्या
पहाटे ५ वा. ५२ मि.
करण १- बालव १७ वा. १३ मि.
करण २ – २७ ऑगस्टच्या पहाटे ५ वा. ५६ मि.
चंद्रराशी- मीन २२ वा. २८ मि.
सूर्योदय- ०६ वाजून २५ मिनिटांनी
सूर्यास्त- १८ वाजून ५६ मिनिटांनी
चंद्रोदय- रात्री २१ वाजून ४१ मि.
चंद्रास्त- सकाळी ९ वाजून ३७ मि.
ओहोटी- सकाळी ०८ वाजून ०२ मि.
आणि रात्री २० वाजून ३६ मिनिटांनी
भरती- रात्री २ वाजून ०५ मिनिटांनी
आणि दुपारी १४ वाजून १९ मिनिटांनी
दिनविशेष:- आज आहे बृहस्पती पूजा.
ऐतिहासिक दिनविशेष:
१३०३ साली अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगढ जिंकले.
भारतात स्थायिक झालेल्या तसेच अँल्बेनियन महिला, एक थोर मानवतावादी समाजसेविका, मदर तेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी झाला.
त्यांना इ.स. १९७९ मध्ये शांततेच्या ‘नोबेल पुरस्कार’ आणि इ.स. १९८० मध्ये ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ञ, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक गणेश प्रभाकर प्रधान यांचा जन्म २६ ऑगस्ट १९२२ रोजी झाला.
ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार ‘केसरी’चे संपादक आणि नवाकाळ’चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा मृत्यू २६ ऑगस्ट १९४८ रोजी झाला.