उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१
शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- ५
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष पंचमी सायंकाळी १८ वाजून ४८ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- अश्विनी २८ ऑगस्टच्या रात्री १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत
योग- वृद्धि २८ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत
करण १- तैतिल सायंकाळी १८ वाजून ४८ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- मेष अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २५ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ५५ मिनिटांनी आणि
चंद्रोदय- रात्री २२ वाजून १५ मिनिटांनी आणि
चंद्रास्त- सकाळी १० वाजून २७ मिनिटांनी होईल.
ओहोटी- सकाळी ०८ वाजून ३५ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून ०६ मिनिटांनी
भरती- रात्री २ वाजून ४२ मिनिटांनी आणि दुपारी १४ वाजून ४८ मिनिटांनी
दिनविशेष:- आज आहे जरा जिवंतिका पूजन
ऐतिहासिक दिनविशेष:
ठळक घटना आणि घडामोडी
१९६२ साली नासाने मानव-विरहित यान मरिनर-२ शुक्राकडे पाठविले.
१९३९ साली सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित हेन्केल हे 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.
१९६६ साली वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग झाला.
२७ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.
१८५४ साली प्रख्यात कायदेपंडित, विद्वान राजकीय नेते दादासाहेब खापर्डे यांचा जन्म झाला.
१८५९साली उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म झाला.
१९०८ साली ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज क्रमवीर सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म झाला.
१९१९ साली संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. वि. रा. करंदीकर यांचा जन्म झाला.
१९५५ साली संतचरित्रकार महाराष्ट्र-भाषाभूषण जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १८७९ रोजी वराड मालवण येथे झाला होता. हे मराठी चरित्रकार, लेखक, पत्रकार होते.
१९९५: भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मधू मेहता यांचे निधन झाले. त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, निष्कलंक चारित्र्य आणि देशहिताची तळमळ यामुळे त्यांना आणि त्यांच्या शब्दाला समाजात मोठा मान होता.