मित्रत्व आणि सामाजिकत्व जपणारा निष्ठावंत!

मान. श्री. शिवाजी राणे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा!

मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिक लोकाधिकार समितीचे जेष्ठ नेते व माजी उपाध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी माननिय श्री. शिवाजी राणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वाढदिवसादिवशी वाढदिवस असणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचे गुणगान गावेत, त्याच्या सदगुणांविषयी भरभरून बोलावे जेणेकरून ते सदगुण थोड्याशा प्रमाणात का असेना आपल्याकडे येतात; असा प्रघात असल्याने आमचे जवळचे बालपणापासूनचे मित्र, शिवनेरी इमारतीतील शेजारी, सुख-दुःखाच्या प्रसंगात सदैव सहकार्य करण्यासाठी तत्पर असलेले श्री. शिवाजी राणे यांना वाढदिवसाच्या आमच्या परिवाराकडून आणि शिवनेरीच्या रहिवाशांकडून खूप खूप शुभेच्छा! त्यांना त्यांच्या जीवनात सुख, समाधान, आनंद, सुयश, सुकीर्ती, धन, लक्ष्मी आणि सदृढ आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो; ही परमात्मा हनुमंता चरणी प्रार्थना!

श्री. शिवाजी राणे यांनी आपल्या आयुष्यात नेहमी मैत्री जपण्याला प्राधान्य दिले. शेजारधर्म जपला. कोणाला काही मदत लागल्यास ती मोठ्या प्रेमाने आनंदाने केली. कसलाच गर्व नाही, फुकाचा अभिमान बाळगला नाही. अभ्यासू वृत्तीने शिवसेनेत मानाचे स्थान मिळविले. शिवसेनेचा कट्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ख्याती मिळविली. म्हणूनच मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिक लोकाधिकार समितीचे ते जेष्ठ नेते झाले, उपाध्यक्ष झाले. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. आपल्या नातेवाईकांमध्ये – मित्रमंडळींमध्ये आदराचे स्थान निर्माण केले. हे खूप कमी लोकांना जमते. मित्रत्व आणि सामाजिकत्व जपणारा निष्ठावंत म्हणून त्यांनी निर्माण केलेला आदर्श खूपच मोठा आहे. त्या आदर्शाला सलाम करावाच लागेल.

स्वाभिमानी नेतृत्व करून कामगारांना आणि कार्यकर्त्यांना शिवाजी राणे यांनी आपलेसे केले होते. प्रामाणिक आणि कार्यक्षम सदैव जपून त्यांनी आजपर्यंतची केलेली वाटचाल नेहमीच स्मरणात राहणारी आहे. भविष्यातही त्यांच्याकडून जे कार्य होईल ते सुद्धा अभिमानास्पद असेल; हा नुसता विश्वास नाही तर दृढविश्वास मला आहे. अशा माझ्या मित्राला आजच्या दिवशी मानाचा मुजरा!

सहसंपादक- मोहन सावंत
पाक्षिक- स्टार वृत्त

You cannot copy content of this page