सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांचे एकत्रीकरण व संमेलन
सिंधुदुर्ग म्हणजे कलेची खाण आणि प्रत्येक कलेचा कलाकार हा या खाणीतील रत्न. अशाच या रत्नाची एकत्रित सूची बनवून या सर्व रत्नाचा खजाना बनवावा असा विचार आला.
त्या अनुषंगाने काही कलाकारांशी बोलणे केले असता, ते पण उत्साहाने आणि आनंदाने या कार्यासाठी तयार झालेत.
याचा पहिला भाग म्हणून प्रत्येक तालुक्यातील कलाकार नोंदणी करून विविध क्षेत्रातील कलाची व कलाकारांची सूची बनविणे व त्या नंतर जिल्हास्तरीय संमेलन व तालुकास्तरीय संमेलनाचे आयोजन करून कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देणे, काही लोप पावत चाललेल्या कलांच्या पुनरुज्जीवित करणे; यासाठी काहीतरी करावे असा निस्वार्थी हेतू ठेऊन हे कार्य करावयाचे निश्चित केले. कारण प्रत्येकच कला ही त्याच्या क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे.
परंतु सहजच मनामध्ये विचार आला की हे सर्व कलाकार एकमेकांना तरी ओळखत असतील काय? त्याचप्रमाणे हे अद्वितीय कलाकार आपल्या जिल्ह्यांमध्ये आहेत याची माहिती जगाला आहे काय ? या कलाकारांच्या कलाचा प्रचार, प्रसिद्धीसाठी व आर्थिक उत्पन्न यासाठी काही करता येईल काय? काही कला लोप पावत चालल्या आहेत त्याचे पुनरूज्जीवन करून आपला सांस्कृतिक वारसा कसा जपता येईल? याचा विचार करून हे एकत्रीकरण करण्याचा विचार आहे. या कलाकारांच्या कलांचे प्रदर्शन भरविण्याचा देखील मानस आहे.
काही कलांची नावे मला मिळाली आहेत. पण या व्यतिरिक्त कोणती कला तुमच्याकडे किंवा माहितीत कोणाच्या अंगी असेल तर त्यांची नोंदणी खाली दिलेल्या समन्वयककडे करावी. संमेलनाचे आयोजन करताना आपणांस निमंत्रित करण्यात येईल.
कलेची व कलाकारांची नोंदणी दिनांक २ ऑक्टोबर २०१८ पर्यंत खाली तालुकानिहाय दिलेल्या समन्वयकांच्या दूरध्वनी क्रमांकावर करावी. कारण अगदी लवकरच, शक्यतोवर काही दिवसातच कलाकारांचे जिल्हास्तरीय संमेलन घेण्याचा मानस आहे.
समन्वयकांचे संपर्क क्रमांक : –
दोडामार्ग/सावंतवाडी – 94041 72172
कुडाळ – 94203 06408
वेंगुर्ला -94059 25556
मालवण -94238 06336
कणकवली- 9423881082
देवगड – 94211 46257
वैभववाडी – 92715 73500
नोंदणी करताना
*नाव*
*तालुका*
*कलेचे नाव*
*संपर्क क्रमांक*
या पद्धतीने माहिती SMS ने द्यावी जेणेकरून संबंधित कलाकारास संपर्क करणे सोपे जाईल. आपल्याकडून या एकत्रीकरणासाठी सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.
ज्या कलांची मला माहिती मिळाली त्याची यादी सोबत जोडत आहे.
१. दशावतार
२. भजन
३ कीर्तन
४ कळसूत्री बाहुल्या
५ चित्रकार (रांगोळी, वाळूशिल्प, काचेवर केलेले वाळूचित्र)
६ गायक
७ वादक
८ अभिनय
९ नृत्य
१० निवेदक
११ लेखक
१२ कवी/ गजलकार
१३ वाद्य बनवणारे
१४ काष्ठशिल्प / लाकडी खेळणी
१५ हस्तकला/ बांबूपासून वस्तू
१६ मूर्तिकार / मातीची भांडी बनवणारे
१७ विणकाम
१८ चित्रपट दिग्दर्शक
१९ करवंटीपासून वस्तू बनवणारे
२० शिंपल्यापासून वस्तू बनवणारे
२१ मिमिक्री (नक्कल करणारे )
२२. हस्ताक्षर
२३. चित्रकथी ( पिंगुळी)
२४. व्यंगचित्रकार
त्या व्यतिरिक्त इतर ज्ञात – अज्ञात काही कला असतील तर या यादीत समाविष्ट करावी.
-विजय जोशी, उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग