सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या सेवा ग्रामीण भागात टेलीमेडिसिनद्वारे आता उपलब्ध
आपण हे बघतो की ग्रामीण भागातील जनतेला विशेष आजारांसाठी स्पेशालिस्ट किंवा सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जावे लागले तर खेडेगावातून रिक्षा, टेम्पो, बस यांनी प्रथम तालुका पातळीवर आणि त्यानंतर तिथून मोठ्या शहरातील दवाखान्यात डॉक्टरांकडे जावे लागते आणि यासाठी प्रवास खर्च आणि दिवसभराचा प्रवासाचा त्रास आणि आपल्याला सोबत म्हणून ज्या व्यक्तीला घ्यायचे असेल त्यांचा देखील भार आपल्यावर असतो. या डॉक्टरांची मोठी भक्कम फी आणि औषधांचा होणारा खर्च हा पुन्हा वेगळाच असतो. या सर्व गोष्टींचा विचार करता, आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास व खर्चाचे आकडे लक्षात घेऊन ग्रामीण भागातील अनेक जण आपले आजार हे अंगावर काढतात. त्यामुळे नको ती परिस्थिती ओढावते.
ही परिस्थिती लक्षात घेता यावर ग्रामपातळीवर यासाठी काय करता येईल याबाबत माझा अनेक महिन्यांपासून शोध चालू होता आणि आता तो सापडलेला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे २२ मंडळ अधिकारी पातळीवर टेलीमेडिसिनद्वारे या आरोग्य सेवा शासन मान्य अशा अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार व मागणीनुसार अजून १५ ठिकाणी अशा सेवा सुरू करण्याचा विचार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ गणेशोत्सवाच्या कालावधीत आपण करणार आहोत.
समर्थ सेवा केंद्र (SSK) असे या उपक्रमाचे नाव दिले असून या संदर्भात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे कार्य आपण सुरू करीत आहोत. *समर्थ सेवा केंद्राच्या* या कार्यकर्त्यांना याबाबत प्रशिक्षण दिलेले असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या साहाय्याने तसेच उपलब्ध असलेल्या स्थानिक डॉक्टरांच्या सहाय्याने किंवा वैयक्तिकरित्या सुद्धा हे काम गावोगावी कॅम्पच्या स्वरूपात सुरू करण्याचा मानस आहे. मात्र यासाठी इंटरनेटची सोय असणे अनिवार्य असते.
यामध्ये या कार्यकर्त्यांना लॅपटॉप व इतर आवश्यक साहित्य/ किट पुरविण्यात आलेले असून इंटरनेटच्या सहाय्याने मुंबई, दिल्ली, कलकत्ता किंवा इतरत्र असलेल्या विशेष तज्ज्ञ डॉक्टर्स किंवा आपणास अपेक्षित असलेले पॅनलवरील डॉक्टर्स यांच्याशी आपण ग्रामीण भागात बसूनच बोलू शकतो. आपले आजार आपण त्यांना सविस्तर सांगू शकतो. त्यावर ते लांबवर बसलेले डॉक्टर्स यावर औषधोपचार सुचवितात . या टेली मेडिसीन तंत्राचा वापर करून या कार्यकर्त्यांपैकी एकाने आपल्या वृद्ध आजारी आईचा जीव वाचविलेला आहे. बैठकीमध्ये त्यांनी स्वतःचे वृत्तांत कथन केल्यानंतर धन्य वाटले.
प्रथमत: या प्रकारच्या उपक्रमाबाबत अनेकांना संशय किंवा शंका असणे स्वाभाविक आहे. परंतु याबाबत आपण संबंधित कार्यकर्त्यांशी चर्चा करावी . ते या उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती सांगतिल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध मंडळ स्तरावर नेमलेले *कार्यकर्ते यांची फोन क्रमांकासह यादी* सोबत जोडलेली आहे.
समर्थ सेवा केंद्र ( SSK) हे अनेक प्रकारचे कार्य/ उपक्रम भविष्यात करणार आहे. त्यापैकी त्यांच्यामार्फत राबविण्यात येणारा हा अजून एक उपक्रम आहे.
सुदृढ, निरोगी व सशक्त ग्रामीण जनतेसाठी म्हणजेच समर्थ ग्रामसाठी, समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून, माझा अजून एक उपक्रम . . .
-विजय जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
संपर्क:-
सांवतवाडी- Sushil B.Amunekar- 9604075772
बांदा- Saurabh Siddhaye 9421265211,
आंबोली- Amey Mundle 9404172172
तळकट- Prashant Kumbhar 9403084334
साटेली-भेडशी- Bhushan Pangam 9423814205
वेंगुर्ला- Omkar Marathe 9405925556
वेतोरे – Mayuresh Manjrekar 8390479750
कुडाळ- Smita Tendolkar 8275672024
कसाल- Pradnyesh Kumthekar 9420259402
कडावल- Sunil Palav 9850446759
माणगांव- Vikas Sawant 9404395676
पिंगुळी- Anjali Mutalik 9420306408
मालवण- Gaurav Kode 9403563231
आंबेरी- kishor Pendurkar 9049110765
पेंडूर- Seema Pendurkar 7066315705
मसूरे- Rajeshkumar labde 9423806336
देवगड- Sadashiv Bhujbal 9422919266
मिठबाव- Sunil Bapat 9421146257
शिरगाव- Darshan Dukhande 9405351975
कणकवली- Harshada Dixit 9423881082
नांदगाव- Prasad Rane 8975933079
वैभववाडी- Shailesh Surve 9271573500