कणेरी (सिद्धगिरी) मठ – आदर्शवत गुरुकुलम्
गेले ५ दिवस आम्ही कोल्हापूर, जयसिंगपूर शिरोळ व कुरूंदवाड येथे वैदिक वास्तु व डाउझींग प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्ताने प्रवास केला. यादरम्यान कणेरी (सिद्धगिरी) मठावरिल गुरुकुलम् पाहण्याचा योग आला. मिझोरामचे राज्यपाल ह्यांची या गुरुकुलम्ला भेट होणार होती, त्यानिमित्त तेथील मुलांना भेटण्याची संधी तेथील व्यवस्था व प्रशिक्षण बाबतीत जाणून घेण्याची आमची विशेष उत्सुकता होती.
१४ विद्या ६४ कलांचे परिपूर्ण प्रशिक्षण या गुरूकुलात दिलं जातं. सर्व ८/९ वर्षाची मुले अस्खलितपणे संस्कृत भाषा बोलतात. आजूबाजूला निसर्गरम्य वातावरणात भव्य दिव्य असे गुरूकुल आहे. सर्व सुखसोयी याच गुरूकुलात आहेत. दर पौर्णिमेला पालकांची भेट पाल्यासोबत होते. आज प्रात्यक्षिकांत ८/९ वर्षाची मुले दांडपट्टा, घोडेस्वारी, उंटस्वारी, सर्व मर्दानी खेळ, संगीत, नाट्य,वादन, दुरसंप्रेशन, वैदिक गणित, ज्योतिषी, वास्तु आणि बरेच काही…. एवढ्या कला यासोबत, लोहार, सुतार, शिल्पकला यातही ही बाळे एवढी प्रवीण आहेत की त्यांनी बनवलेल्या शिल्पांची प्रदर्शन बघितल्यावर कल्पना येईल.
इथल्या मुलांना दररोज शुद्ध सात्विक व पूर्ण १००% सेंद्रिय आहार, देशी गोमातेचे दुध, मठावरील गोशाळा द.भारतातील सर्वात मोठी गोशाळा आहे. १५०० अधिक गोमाता आहेत. विविध प्रजातीच्या गोमाता येथे पाहायला मिळतात.
येथील परिसर हा शुद्ध नैसर्गिक ऊर्जेने परिपूर्ण आहे. आपसुकच विचार शुद्ध होतात. मुलांचा गुरुकुलम परिसराशिवाय अन्यत्र संबंध येत नसल्याने त्यांचे विचार पूर्णपणे निरागस व सात्विक असतात. याविषयावर बरेच बोलता येईल परंतु ज्यांना शक्य होईल त्यांनी एकदा तरी गुरुकुलम पाहावे. येथे पर्यटनाच्या दृष्टीने सिद्धगिरी म्युझियम, भलीमोठी देशी गोशाळा, गोआधारित वैद्यकिय उत्पादने, कैशलेस सिद्धगिरी सुपरस्पेशालिटि हॅास्पिटल्स, १३५० वर्षापूर्वीचा शैव मठ, लखपती सेंद्रिय शेती, सेंद्रिय उत्पादने, प्राचीन कला विद्यालय बघण्यासारखं आहे. राहण्यासाठी छान सुविधा आहेत.
प्रा.डॉ. आनंदसर 9967513609 / 9323068873