ब्लॉकचेन म्हणजे नक्की काय ?

दिवसेंदिवस ऑनलाईन व्यवहार वाढत चालले आहेत. आणि त्याचबरोबर ऑनलाईन चोरांचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यावर एक सुरक्षित उपाय म्हणून हि प्रणाली काम करते. 

आपण जसे एखादी अमूल्य वस्तू (येथे डेटा) एखाद्या बॉक्समध्ये सुरक्षित ठेवतो अगदी तसाच काहीसा हा प्रकार आहे. ह्यात एकात एक असे काही बॉक्स ठेवण्यात येतात. त्याची एक शृंखला तयार केली जाते. त्यालाच ब्लॉकचेन असे म्हणतात.

अशी यंत्रणा हॅकर्सना (ऑनलाइन चोरांना) हॅक करणे शक्य नसते . त्यामुळे गुप्तता, सुरक्षितता याबाबतीत हे तंत्रज्ञान सुरक्षित मानले जाते. यात एकाच वेळेस फक्त दोन व्यक्ती अथवा कॉम्पयुटर्स एकमेकांशी व्यवहार करतात. त्यामध्ये इतर कोणीही लुडबुड करू शकत नाही. 

यातील विशेष बाब हि आहे कि, हे अनेक इंटरनेटद्वारे होणारे व्यवहार (transaction) असतात. ते जगभरातील कोणत्याही एका कॉम्पुटर अथवा सर्व्हरवर ठेवले जात नाही. त्यामुळे कोणताही देश आपला सर्व्हर / कॉम्पुटर बंद करून आपली अडचण करू शकत नाही. अर्थात पाऊस, ऊन, अग्नी, हॅकर यामुळे आपला बचाव होतो आणि आपले ऑनलाईन व्यवहार गुप्त आणि सुरक्षित होतात. 

 

You cannot copy content of this page