(IOT) इंटरनेट ऑफ थिंग्स
Internet of Things (IoT) इंटरनेट ऑफ थिंग्स
सोप्या भाषेत सांगायचे तर अनेक नित्य-वापरातील गोष्टी , स्मार्ट पद्धतीने वापरणे.
नाही कळले ? आणि फोड करून सांगतो. पूर्वी आपण टेलिफोन वापरत असू ज्याला बटणे / डायल असायची. त्यात अनेक सुधारणा झाल्या अनेक बदल झाले. आज आपण स्मार्ट फोन (टचस्क्रीन) वापरतो. येथे स्मार्ट डायलिंग बरोबर आपण व्हॉईज कमांड देऊन एखाद्याला फोन लावू शकतो. आपणाला कोण फोन करतोय तेही समजू शकते. त्याच फोनमध्ये आपण अनेक विविध गोष्टी वापरतो, जसे अलार्म, कॅल्क्युलेटर, ईमेल अकाउंट, झूम मिटिंग, ऑनलाईन बँकिंग, रस्ता (ठिकाण) शोधणे, जॉगिंग ट्रॅक रेकॉर्ड, म्युझिक, ऑडिओ, व्हिडीओ, युट्यूब, इंटरनेट ब्राऊजर, अनेक व्यवसायिक सॉफ्टवेअर (ऍप्लिकेशन) हि लिस्ट खूप मोठी आहे. . .
आपला मोबाईल इतर ठिकाणी देखील जोडलेला असतो, जसे आपला डेस्कटॉप पीसी, लॅपटॉप, टॅबलेट इत्यादी. आता ह्या मोबाईलच्या सहाय्याने यापुढे आपण आपला स्मार्ट टीव्ही, स्मार्ट एसी, स्मार्ट कार, स्मार्ट किजन मधील वस्तू जसे स्मार्ट वॊशिंग मशीन, स्मार्ट कुकिंग अप्लायन्सेस हे सर्व रिमोटरली आणि स्मार्टली ऑपरेट करू शकतो / वापरू शकतो. कारण हे सर्व इंटरनेट , जीपीएस याद्वारे एकमेकांशी जोडले गेल्याने स्मार्टली वापरता येऊ शकते, आणि यालाच इंटरनेट ऑफ थिंग्स असे म्हणतात.