समर्थ आमदार डॉ. भारतीताईं लव्हेकरच!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर झाली; पण त्यामध्ये विद्यमान आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांचे नाव नसल्याने वर्सोवा मतदार संघामध्ये अनेक सुज्ञ मतदार नाराज झाला आहे. ही मतदारांमधील नाराजी भाजपाला न परवडणारी असेल. कारण भविष्यात ह्या मतदारसंघातील मनपाच्या निवडणुकीला आमदार डॉ. भारतीताईंसारखे समर्थ नेतृत्व नसेल. म्हणून सर्वसामान्य मतदारांशी बांधिलकी आणि जनतेच्या प्रश्नावर सातत्याने दहा वर्षे काम करणाऱ्या, लोकप्रिय उच्च विद्याविभूषित आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांचे पहिल्या यादीत नाव असणे अतिशय महत्त्वाचे होते; परंतु त्यांचे नाव पुढील यादीत यावे; अशी सर्वांची इच्छा आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये आमदार म्हणून डॉ. भारतीताई लव्हेकर यांची कामगिरी सर्वोच्च आणि आदर्श अशीच आहे. मतदारसंघातील प्रत्येक समस्येवर अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी भारतीताईंनी मनापासून प्रयत्न केला. वर्सोवा विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्य करताना सामाजिक बांधिलकी ठेवून भारतीताईंनी केलेले कार्य खूप मोठे आहे. विशेषतः महिलांसाठी, तरुणींसाठी, विद्यार्थिंनींसाठी संस्थेच्या माध्यमातून केलेले कार्य लोकप्रिय आहेच; शिवाय त्याची दखल केंद्र सरकारने सुद्धा अनेकवेळा घेतलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ह्याबाबत त्यांचे कौतुक केलेले आहे.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघ हा मिश्रवर्गीय! ह्या मतदारसंघात भारतीताईंनी प्रत्येक वर्गासाठी आवश्यक असणारी अनेक कामे केलेली आहेत. ह्या मतदारसंघावर त्यांची छाप वर्षानुवर्ष राहील; असं त्यांनी कामाचं नियोजन केलेले आहे. डॉ. भारतीताईंनी विकासाच्या प्रवाहात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना सामावून घेतले. एवढेच नाहीतर वर्सोवा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांना त्यांनी आधार दिला. सदैव सहकार्य करण्याच्या भूमिकेतील डॉ. भारतीताई गेल्या दहा वर्षात वावरल्या! आमदार फंडातून केलेली कोट्यवधींची कामे त्यांच्या कार्याचा प्रत्यक्ष पुरावा मतदारसंघात देतात. त्यातूनच त्या जनतेच्या लोकप्रिय आमदार झाल्या.
कोरोना महामारीच्या काळामध्ये डॉ. भारतीताईंनी केलेले कार्य कधीही न विसरता येण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे रस्ते, पाणी, वीज याबाबत ताईंची आक्रमकता मतदारांनी अनुभवली. वर्सोवा किनाऱ्यावरील कोळी समाजाचा प्रश्न त्यांनी विधानसभेत अनेकवेळा मांडून त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेतल्या. सर्वसामान्यांचे दुःख, समस्या विधानसभेमध्ये मांडून राज्याचे-केंद्राचे लक्ष वेधून घेतले. सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणून भारतीताईंना पाहत असताना आमदार कसा असावा? हे राज्याला नव्हे तर देशाला दाखवून दिले. असा आदर्श आमदार पुन्हा पुन्हा व्हावा; असा आमदार पुन्हा पुन्हा मिळावा; ही वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची इच्छा आहे. भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत डॉ. भारतीताईंचे नाव आले की ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल.
आपण डॉ. भारतीताई यांच्या कार्याची यादी पाहिली तर सहजपणे लक्षात येतं त्यांच्या कार्याचा आवाका खूप मोठा आहे. रस्ते, पाणी, म्हाडा, गावठाण जमिनी, कोळी वाडे, कांदळवन संरक्षण, वैद्यकीय सुविधा, एसआरए योजना अशा अनेक विषयांवर ताईंनी नेहमीच मतदारांच्या बाजूने केलेले काम मतदार कधीच विसरणार नाहीत. ह्या मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत अनेक विकासक झोपडी मालकांना भाडे देत नव्हते, जे अपात्र आहेत त्यांना पात्र करून घेण्यासाठी काहीच कारवाई करीत नव्हते, त्यांचे वारस तपास केले जात नव्हते. त्यामुळे अनेक कष्टकरी गरीब लोक संसारात रस्त्यावर आले आहेत. ह्या सर्व समस्या डॉ. भारतीताईंनी आपल्या मतदारसंघात जाणून घेतल्या आणि झोपडीवासीयांचे हक्क त्यांना मिळवून दिले. अनेक राजकारण्यांनी झोपडीधारकांना रस्त्यावर आणले; पण डॉ. भारतीताईंनी मात्र त्यांना न्याय मिळवून दिला; अशी अनेक कामे डॉ. भारतीताईंनी आपल्या मतदारसंघात केली. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. भारतीताई लव्हेकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी द्यावी; अशी मतदारांची मागणी आहे; अन्यथा भारतीताईंनी अपक्ष म्हणून उभे राहावे! वर्सोवा मतदार संघातील सर्व मतदार त्यांच्या पाठीशी तन-मन-धनाने उभे राहतील. डॉ. भारतीताई लव्हेकर यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
-मोहन सावंत
सहसंपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’