सामाजिक कार्यकर्तृत्वाचा आधारवड कोसळला!

स्वर्गीय अंकुश डामरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

असलदे-कोळोशी ग्रुप ग्रामपंचायतीचे (सन १९६३ ते १९७२) माजी सरपंच, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुश डामरे यांना काल देवाज्ञा झाली. असलदे गावासाठीच नाही तर पंचक्रोशीसाठी तसेच क्षा. म. समाजासाठी ही अतिशय दुःखद घटना! त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांच्या सामाजिक जीवनातील नुकसान न भरून येणारे आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेले सामाजिक कार्य मोलाचे आहे. त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी ह्या जगाचा निरोप घेताना सामाजिक कार्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा जो ठसा उमटविला तो येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेल. स्वर्गीय अंकुश डामरे अर्थात आमचे मार्गदर्शक आदर्श जीजी यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास एका लेखांमध्ये मांडणं शक्य नाही. कारण त्यांच्या कार्याचा आवाका खूप मोठा आहे.

ग्रामीण भागामध्ये एखाद्या गावाच्या विकासासाठी कशाप्रकारे कार्य करावे लागते? हे स्वर्गीय अंकुश डामरे यांनी दाखवून दिले. त्यांनी असलदे पंचक्रोशीसाठी केलेले सामाजिक कार्य कधीच विसरता येणार नाही. ही कृतज्ञता जपण्यासाठी आताच्या पिढीने प्रामाणिक व कार्यक्षमतेने पुढाकार घेतल्यास स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या संकल्पनेतील विकास साध्य होऊ शकतो.

आज आमचा हा सामाजिक कार्यकर्तृत्वाचा आधारवड कोसळला आहे. स्वर्गीय अंकुश डामरे यांना पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास श्री रामेश्वराचे आपल्यात सामावून घेतलेच असणार; कारण त्यांनी केलेली सामाजिक सेवा परमात्म्याच्या सेवेसारखीच होती. स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या पश्चात त्यांचे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य श्री साईनाथाने देवो; ही प्रार्थना!

-नरेंद्र हडकर

असलदे गावातील विकासाच्या वटवृक्षाला सलाम!
(स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या नव्वदाव्या वाढदिवशी लिहिलेले संपादकीय वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!)

https://starvrutta.com/news-salute-to-the-banyan-tree-of-development-in-asalde-village/

https://asaldemazagaon.blogspot.com/2022/06/blog-post.html

You cannot copy content of this page