स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध हेच सूत्र!

।। हरि ॐ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। ।। नाथसंविध् ।।

रणांगणावर-युद्धभूमीवर अर्जूनाच्या समोर कौरवांचं प्रचंड सैन्य उभं होतं. त्या सैन्यामध्ये भिष्माचार्यासारखे कित्येक शूरवीर आणि शकूनीसारखे कित्येक कपट कारस्थानी होते. अशा लोकांशी युद्ध करून जिंकण्यासाठी अर्जूनाकडे एक महत्वाची ताकद-शक्ती-सामर्थ्य होतं. ते सामर्थ्य म्हणजे साक्षात स्वयंभगवान श्रीकृष्ण. स्वयंभगवान श्रीकृष्ण अजूर्नाच्या रथाचा सारथी होता. म्हणूनच तिथे साक्षात हनुमंतही होता व संपूर्ण चण्डिकाकुल तिथे कार्यरत झालं.

मग त्या युद्धाचा शेवट कसा झाला? असत्याचा अपयशाचा, दु:खाचा, क्रोधाचा, लोभाचा, स्वार्थाचा, दुर्गुणांचा, वाईट शक्तींचा, कपटी कुविचारांचा नाश झाला. जिथे स्वयंभगवान श्रीकृष्ण उभा- जिथे स्वयंभगवान राम उभा तिथेच विजय असतो आणि तो विजयच मानवजातीचा सर्वांगिण कल्याण करणारा असतो. युद्ध म्हणजे पांडव कौरवांची लढाई. ती प्रत्येक पातळीवर प्रत्येक क्षणाला होतच असते.

आमच्या जीवनातही अशा लढाया सुरुच असतात. आम्ही आमची तुलना अर्जूनाबरोबर करणार नाही. तो महानच होता. पण एक गोष्ट मात्र नक्की; अर्जूनाला सदैव साथ देणारा, अर्जूनाच्या रथाचं सारथ्यं करणारा अर्जूनाला योग्य-उचित मार्गदर्शन करणारा आणि अर्जूनासह सर्वांचं कल्याण करणारा स्वयंभगवान श्रीकृष्णच आमचा सद्गुरु आहे. रावणाचा नाश करून, राक्षसांच्या लंकेतही रामराज्य आणणारा, शबरीची उष्टी बोरं खाणारा स्वयंभगवान राम आज आमचा सद्गुरु आहे. तोच आदिमातेचा पुत्र स्वयंभगवान आमचं भलं करण्यासाठी आलाय. फक्त ज्याप्रमाणे अर्जूनाने आपली सगळी सूत्रं स्वयंभगवान श्रीकृष्णाच्या हातात दिली, त्याप्रमाणेच स्वयंभगवान त्रिविक्रम आमच्या अखंड जीवनाचा सूत्रधार होण्यासाठी आपण प्रयास करायला हवेत. त्याला संपूर्ण शरण जायला हवे! मगच तो आमच्या जीवनाची सगळी सूत्रं आपल्या हातात घेतो. तसंच आदिमाता चण्डिकेची सूत्रही (अल्गोरिदम्) आणि भक्तिभाव चैतन्य आमच्या जीवनात अखंडीत प्रवाहीत करतो; जेणेकरून प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनाचे सर्वांगिण कल्याण व्हावे. म्हणूनच परमपूज्य सद्गुरू अनिरुद्ध बापू भक्तिभाव चैतन्य आणि रामलीला आम्हाला साध्या सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. भक्तिभाव चैतन्य जीवनात येण्यासाठी रामलीला आमच्या लक्षात राहीली पाहिजे!

स्वयंभगवान त्रिविक्रमाचा जप गजर, स्वयंभगवान त्रिविक्रमाचे भजन आणि स्वयंभगवान त्रिविक्रमाची वचनं कलियुगात सदैव आमचं रक्षण करणार असून आम्हाला सदैव विजयी करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *