फ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याची सवय आरोग्याला घातक

कडक उन्हाळा सुरु आहे. तहान भागविण्यासाठी फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने खूप बरे वाटते. काहीजण पाण्यामध्ये बर्फ टाकून पाणी पितात; परंतु ही सवय आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारी असते. फ्रीजमधील थंडगार पाणी किंवा बर्फाचे पाणी अनेक आजारांना घेऊन येणारे विष असते.

१) थंड पाणी प्यायल्याने आतड्या आकुंचित होतात. ज्यामुळे अन्न योग्य पद्धतीने पचन होत नाही व त्यामुळे अन्नातील पोषकमुल्ये शरीराला मिळू शकत नाहीत. अन्नपचन न झाल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामधील सर्वात महत्त्वाची समस्या बद्धकोष्ट आहे. आयुर्वेदामध्ये बद्धकोष्ट हे सर्व आजारांचे मूळ म्हटले जाते. बद्धकोष्ट आपल्या शरीराची यंत्रणा बिघडविते. त्यातून अनेक आजार होतात.

२) शरीराचे तापमान साधारणपणे ३७ अंश सेल्सिअस असते.पण जेव्हा आपण कमी तापमान असलेले पेय पितो, तेव्हा तुमच्या शरीराला बदललेले तापमान संतुलित करण्यासाठी उर्जा खर्च करावी लागते. अन्नाचे पचन करणे, पोषणमुल्ये शोषून घेणे यासाठी वापरण्यात येणारी उर्जा तापमान संतुलित करण्यासाठी वापरल्यामुळे शरीराला पोषणमुल्ये कमी प्रमाणात मिळतात.

३) थंड पाण्याने श्वसनमार्गामधील श्लेष्मल थराचा भाग वाढतो. या भागातील श्लेष्मल थरामुळे श्वसनमार्ग संवेदनशील होतो; ज्यामुळे विविध इनफेक्शन होऊन घसा खवखवण्याची शक्यता देखील वाढते.

४) फ्रिजमध्ये ठेवलेले पाणी कृत्रिमपणे थंड होते तापमान नियंत्रित नसल्यामुळे ते सारखे सारखे थंड आणि गरम होत असते साधारणपणे फ्रीजमध्ये ठेवलेले पाण्याचे तापमान सामान्य पेक्षा अत्यंत कमी असते आणि या कारणामुळे सर्दी खोकला इत्यादी समस्या होऊ शकतात सोबतच असे थंड पाणी पिण्यामुळे फुफ्फुसाचे घातक आजार होऊ शकतात.

५) फ्रिजमध्ये ठेवलेले थंड पाणी पिण्यामुळे गळा खराब होऊ शकतो तसेच दररोज फ्रीज मधील थंड पाणी पिण्यामुळे टॉन्सिल्सची समस्या होऊ शकते.

४) थंड पाणी प्यायल्यामुळे ह्रदयाचे ठोके वाढू लागतात. एका संशोधनानुसार vagus nerve उत्तेजित होते.vagus nerve ही १० वी cranial nerve असून ती शरीराच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवाणाऱ्या स्वायत्त मज्जासंस्थेचा एक महत्वाचा भाग असते. vagus nerve ह्रदयाचे ठोके कमी करण्यासाठी कारणीभूत असते.

You cannot copy content of this page