सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस
मालवण तालुक्यात सर्वाधिक 190 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 1६ (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वच तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे. कुडाळ वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शतक पार केले असून मालवण तालुक्यात सर्वाधिक 190 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 143 पूर्णांक 55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 630.7मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.
दोडामार्ग – 118(640), सावंतवाडी – 172(768.3), वेंगुर्ला – 128.4 (512.4), कुडाळ – 92(507), मालवण – 190(693), कणकवली – 142(692), देवगड – 150(623), वैभववाडी – 156(610), असा पाऊस झाला आहे.