AI and ML ? एआय आणि एमएल ?

AI and ML [[Artificial Intelligence (AI) and Machine Learning (ML)]]

कृत्रिम हुशारी / मशीनने स्वतः शिकणे 

यापुढे माणसांची अनके कामे मशीन करतील आणि ते कसे करायचे ते स्वतःच शिकतील.

म्हणजे जेव्हा आपण ए आय (AI) बाबत बोलत असतो तेव्हा आपण एम एल (ML) बद्दलच चर्चा करीत असतो. 

जागतिक व्यवसायात, अनेक मान्यताप्राप्त कंपन्यांनी  AI चा वापर सुरु केल्याने, उत्पादन, विक्री याबरोबर ग्राहकांची आवड त्यांचा खरेदीचा कल जाणून घेणे या सारख्या कित्येक बाबतीत [Business Intelligence (BI)] व्यावसायिक यश प्राप्त करून घेत आहेत आणि उत्तमोत्तम कामगिरी पार पाडत आहेत.

 हळूहळू आपल्याला सगळ्याच ठिकाणी याचा सरार्स वापर होताना दिसेल. आपल्याला याचे सहज सोपे उदाहरण म्हणजे आपण आपल्या सर्व प्रकारच्या डिव्हासवर (जसे डेस्कटॉप पीसी, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल इत्यादी ) यावर गुगलचा वापर करीत आहोत. आपले गुगल अकाउंट म्हणजेच जीमेल आणि गुगल सर्च यावर जे काही शोधाल त्याबाबत / त्या संबंधित माहिती देना-या लिंक्स आपल्याला सगळीकडे दिसू लागतात. 

आपण गुगलवर जर एखादे पेन शोधण्याचा प्रयत्न केलात तर आपल्याला हे जाणवेल कि गुगल सर्व ठिकाणी आपल्याला पेनबाबत विक्री करणा-या वेबसाईटची माहिती द्यायला सुरुवात करतॊ. जसे amazon.in, flipkart.com, Snapdeal.com, myntra.com etc.  ह्या उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात येते कि आपण जे काही शोधतो आहोत याची माहिती AI मुळे आपल्यासमोर येत आहे. परंतु ते शक्य होते कारण मशीन ( एक प्रोग्रॅम) स्वतःच त्याबाबत शिकून / समजून घेऊन त्याबाबतची अधिक माहिती वारंवार आपल्यासमोर देत रहातो. 

अशा प्रकारे विविध प्रकारचे प्रोग्रॅम आपल्या कळत – नकळत आपल्याला मदत करीत असतात. यापुढे हीच मदत आपली सवय व्हायला वेळ लागत नाही. जसे सकाळी उठल्याबरोबर व्हॉट्सपवर / टेलिग्रामवर / इन्स्टा ग्रामवर / जीमेल / याहू / हॉटमेल येथे मेसेज पहाणे, त्यांना योग्य तो रिप्लाय देणे इत्यादि.