सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे:
१) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.700 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे.
२) कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे.
३) खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.200 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.
४) कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे.
५) तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 1.700 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर आहे.

अशी माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

error: Content is protected !!