भिंत कोसळून मालाडमध्ये १९ जण मृत्युमुखी आणि ७५ जण जखमी, तर पुण्यात ६ जण ठार
मुंबई:- मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला आणि तो जीवघेणा ठरला. मुंबईतल्या मालाडमधील कुरार भागात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळून १३ जण ठार झाले.तर ७५ जण जखमी झाले आहेत. रात्रभर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू होते. शनिवारीच पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. ज्या घटनेत सहा जण ठार झाले आहेत. मालाडमध्ये रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळून १३ जण ठार झाले आहेत. स्थानिकांनी व नंतर फायर ब्रिगेडच्या जवानांनी आणि एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्य केले. पावसामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होते.
अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. जखमींवर शताब्दी रुग्णालयात आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच शताब्दी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनतर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राला भेट देऊन पाहणी केली.