सुषमा स्वराज यांना अनेक मान्यवरांसह विदेशातून आणि सामान्य जनतेकडून श्रद्धांजली
नवीदिल्ली:- राजकारणात राहूनही लोककल्याणकारी निर्णय घेऊन आपला ठसा उमठविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले आणि मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहताना म्हणतात, श्रीमती सुषमा स्वराज के निधन से बहुत दुःख हुआ है। देश ने अपनी एक अत्यंत प्रिय बेटी खोई है। सुषमा जी सार्वजनिक जीवन में गरिमा, साहस और निष्ठा की प्रतिमूर्ति थीं। लोगों की सहायता के लिए वे हमेशा तत्पर रहती थीं। उनकी सेवाओं के लिए सभी भारतीय उन्हें सदैव याद रखेंगे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहताना भावना व्यक्त करतात की, भारतीय राजकारणातील तेजस्वी अध्यायाचा अस्त झाला. स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील तेजस्वी अध्यायाचा अस्त झाला आहे. त्यांनी जनहितासाठी आणि गरिबांसाठी आयुष्यभर काम केलं. त्या उत्तम वक्ता, उत्तम प्रशासक होत्या. प्रकृती ठिक नसतानाही त्यांनी गेल्या पाच वर्षात माझ्या मंत्रिमंडळात त्यांनी अविश्रांत काम केलं. लोकांना न्याय देण्यासाठी त्या सदैव तत्पर असत.
देशातील अनेक मान्यवरांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विदेशातूनही अनेकांनी तर देशात समाजमाध्यमांवर सामान्य लोकांनीही आपापल्यापरीने दुःख व्यक्त केले आहे.