`व्ही.जे.टी.आय.’चा आदर्शवादी उपक्रम- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सलग १८ तास अभ्यास अभियान!

मुंबई (प्रतिनिधी):- अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण देणाऱ्या व १३७ वर्षे जुन्या असलेल्या मुंबई माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजिकल इन्स्टिट्यूट ह्या नामांकित शिक्षण संस्थेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३‌३ व्या जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही सलग १८ तास अभ्यास अभियान आज सुरु झाले आहे.

हेही वाचा…  (कृपया इथे क्लिक करा!)
संपादकीय- देशाला गौरवास्पद असणाऱ्या आदर्श शिक्षकाचा सन्मान!
व्हीजेटीआयचे प्रा. डॉ. केशव सांगळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान!
वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

`व्ही.जे.टी.आय.’ची स्थापना १८८७ मध्ये झाली. तेव्हा व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेचे नाव २६ जानेवारी १९९७ रोजी बदलून वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजिकल इन्स्टिट्यूट असे करण्यात आले. व्हीजेटीआय ही शैक्षणिक व प्रशासकीय स्वायत्त संस्था आहे; परंतु ती मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. या संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक साहाय्य आहे. दर्जेदार व गुणवत्तापुर्वक शिक्षणामुळे ह्या संस्थेस जागतिक किर्ती प्राप्त झाली आहे. आजही ही संस्था आपल्या उज्वल परंपरेनुसार अनेक आदर्शवादी उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विशेष आदर्शवादी उपक्रम साजरा करून साजरी केली जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या अपार कष्टांची आठवण म्हणून आणि देशासाठी दिलेले सर्वोच्च योगदानाचे माहात्म्य समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये येऊन सलग १८ तास अभ्यास करायचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण व्यक्त करायचे; त्यांची जयंती साजरी करायची! असा आदर्शवादी उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सलग १८ तास अभ्यास अभियान आज राबविले जात आहे. आज शनिवार दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत संस्थेतील विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करायचा आहे. सलग १८ तास अभ्यास अभियानात संस्थेतील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सलग १८ तास अभ्यास अभियान घेऊन `व्ही.जे.टी.आय.’ने आदर्शवादी उपक्रम राबविल्याबद्दल अनेक शिक्षण तज्ञांनी कौतुक केले आहे. असे अभियान राज्यातील इतर शिक्षण संस्थांनी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उतुंग कार्याला सलामी द्यावी! असेही अनेक नामवंतांनी मत व्यक्त केले आहे. व्ही.जे.टी.आय.चे मुख्य संचालक सचिन कोरे यांनी ह्या उपक्रमास अग्रक्रम देऊन शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवा आदर्शवाद जोपासण्यास प्रवृत्त केले आहे; त्याबद्दल त्यांचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page