महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी प्रा. नितेश केळकर यांची नियुक्ती!
रत्नागिरी- महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी प्राध्यापक नितेश केळकर यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख-उद्धव ठाकरे, पर्यावरण-वन व राजशिष्टाचार मंत्री शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे मुख्य सल्लागार व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी प्राध्यापक नितेश केळकर यांची नुकतीच निवड झाली.
ह्या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या समस्या संबंधित यंत्रणेकडे संघटनेमार्फत मांडल्या जातील आणि त्यावर योग्य ती कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल; अशी प्रतिक्रिया प्राध्यापक नितेश केळकर यांनी आमच्या प्रतिनिधीकडे दिली.
प्रा. नितेश यशवंत केळकर रत्नागिरीतील शिवार आंबेरे येथील लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात कार्यरत आहेत. प्राध्यापक नितेश केळकर जिल्ह्यातील अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात; त्याचप्रमाणे शैक्षणिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कार्याला अधिक वेग येणार असून यासंदर्भात प्राध्यापक वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.