अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार

कसाल:- सर्वात युवा अर्जुन पुरस्कार विजेती; मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी देशातील पहिली खेळाडू हिमानी परब हिचा तिच्या सिंधुदुर्गातील कसाल येथील निवासस्थानी जाऊन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार करण्यात आला. तिच्या उतुंग यशाबद्दल ह्यूमन राईटच्यावतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.

त्यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफ भाई पीरखान, कणकवली तालुका सदस्य प्रवीण गायकवाड, मनोज वारे, कुडाळ तालुका सदस्य गणेश मेस्त्री, प्रमिला वाडकर उपस्थित होते.

सर्वात युवा अर्जुन पुरस्कार विजेती; मल्लखांब खेळात अर्जुन
पुरस्कार मिळवणारी हिमानी परब ही देशातील पहिली खेळाडू

जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर ठाणे येथील हिमानी परबने क्रीडा पुरस्कारात विक्रम नोंदविला. मल्लखांबमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे तिला नुकताच राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गाैरव करण्यात आले. तिने वयाच्या २० व्या वर्षी हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे हा बहुमान मिळवणारी हिमानी ही सर्वात युवा खेळाडू आणि मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी देशातील पहिली खेळाडू ठरली. महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या हिमानीने प्रावीण्य संपादन करत वयाच्या नवव्या वर्षी जर्मनीत युवकांना मल्लखांब प्रशिक्षण दिले.

You cannot copy content of this page