संजय बाबर यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती

कणकवली (संतोष नाईक):- सोलापूर प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कणकवली पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक संजय बाबर यांना नागपूर शहरात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.

कणकवली पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना संजय बाबर यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. प्रेमळ स्वभावामुळे विविध क्षेत्रातील अनेक मित्रमंडळी त्यांनी जोडून ठेवली आहे. बढतीमुळे त्यांच्यावर मित्रमंडळींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page