ना. प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा सहकार आघाडीतर्फे आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्य वाटप होणार!
मुंबई (युवराज डामरे)- भाजपा सहकार आघाडीतर्फे विधानपरिषद गट नेते, स्वयं पुनर्विकास प्राधिकरणचे अध्यक्ष ना. प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून तेटवली गावात ( ता. विक्रमगड, जि. पालघर) आदिवासी पाड्यातील कुटुंबियांना दिवाळी फराळ साहित्य वाटप सहकार आघाडीचे मुंबई अध्यक्ष सुनील बांबुळकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
भाजपा सहकार आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता तेटवली गावात जातील. त्यानंतर आदिवासी परंपरेप्रमाणे तारफा नृत्याने उपस्थितांचे स्वागत होईल. त्यावेळी आदिवासी पाड्यातील ग्रामस्थ तेथील विकासाबाबत आपले मनोगत व्यक्त करतील. दुपारी भाजपा सहकार आघाडीचे मुंबई अध्यक्ष सुनील बांबुळकर आपले विचार मांडतील आणि आदिवासी ग्रामस्थांसमवेत केक कापून ना. प्रवीण दरेकर यांचा वाढदिवस साजरा करतील. त्याचप्रमाणे आदिवासी पाड्यातील कुटुंबियांना दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात येईल. स्थानिक ग्रामस्थांबरोबर स्नेह भोजन झाल्यानंतर चर्चा संवाद आणि शिवार फेरी असे कार्यक्रम होतील.
यावेळी भाजपा सहकार आघाडीचे मुंबई महामंत्री सुधाकर कदम आणि प्रमुख पदाधिकारी – कार्यकर्ते तसेच पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक मोहन सावंत, जेष्ठ समाजसेवक सुरेश डामरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.