ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचा सामाजिक सेवेद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा!

फोंडाघाट येथील कातकरी समाज बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप

फोंडाघाट (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुकाच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संघटनेच्यावतीने फोंडाघाट येथील गरीब आणि गरजू आदिवासी पाड्यातील कातकरी समाज बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप करण्यात आले आणि सामाजिक सेवेद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

देशाला स्वातंत्र्य मिळवून पाऊणशे वर्षे होऊनही खेडेगावातील अनेक कुटुंबे दोन वेळचे पोटभर अन्न मिळवू शकत नाहीत. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजांपासून ते वंचित राहिले आहेत. असे अनेक आदिवासी पाडे आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी सिंधुदुर्गात आहेत. अशा कुटुंबाबद्दल सहानुभूती ठेवून सामाजिक सेवेद्वारे प्रजासत्ताक दिन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुकाच्या वतीने साजरा करण्यात आला व फोंडाघाट येथील कातकरी समाजातील गरीब कुटुंबीयांना अन्नधान्य साहित्याचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी उपस्थित ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, कणकवली तालुका अध्यक्ष हनिफभाई पिरखान, उपाध्यक्ष संदेश बांदेकर, सचिव मनोज कुमार वारे, खजिनदार रुपेश खाडये, माजी उपाध्यक्ष प्रकाश नारकर, संतोष टक्के फोंडाघाट उपस्थित होते.