मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात दिली ‘सद्भावना दिन’ शपथ

मुंबई:- माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना ‘सद्भावना दिन’ ची शपथ दिली.

याप्रसंगी परिवहनमंत्री दिवाकर रावते, रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर, पर्यावरणमंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर, सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, कामगारमंत्री डॉ. संजय कुटे, कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव अजोय मेहता, आमदार स्नेहलता कोल्हे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page