नागरिक सहाय्य केंद्र संचलित ज्ञानेश्वर विद्यालयाचे अभिनंदनीय यश!

मुंबई (मोहन सावंत):- नागरिक सहाय्य केंद्र संचलित ज्ञानेश्वर विद्यालयातील मराठी माध्यमाच्या ४२ विद्यार्थ्यांपैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ९०.२४% निकाल व इंग्रजी माध्यमाच्या ३० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण होवुन १००% निकाल लागला आहे.

मराठी माध्यम विभाग-
पहिला – मधुकर वैभवी भीमराव- ८८.२० टक्के
दुसरा – कराड ओमकार एकनाथ- ७४.८० टक्के
तिसरा – कल्पूंद एलिझा दानवेल- ७४.२० टक्के
चौथा- जगदाळे जानकी दत्तात्रय- – ७२.६० टक्के
पाचवा- नाचरे यश दीपक- ७१.४० टक्के

इंग्रजी माध्यम विभाग-
पहिला – अन्सारी अरिबा मोहम्मद – ८९.०० टक्के
दुसरा – गीता मिहीर प्रकाश- ८३.६० टक्के
तिसरा – शर्मा पंकजकुमार राजकुमार- ७५.२० टक्के
चौथा- खान रमला कलीम- ७४.२० टक्के
पाचवा- चंदनशिवे कबीर दिनेश- ७४.२० टक्के

नागरिक सहाय्य केंद्र संचलित ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमात परिसरातील कष्टकरी जनतेची आणि सर्व जाती धर्माची मुले शिकत असतात. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यावर नेहमीच येथील शिक्षक भर देतात. ह्या शैक्षणिक उपक्रमास संस्थेचे पदाधिकारी सहकार्य करतात. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे, सर्व शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचारी, पालक,व विश्वस्तांचे अभिनंदन सर्व थरातून होत आहे.