काॅस्मोपोलीटन सोसा. असोसिएशनच्या आवारात मोफत आरोग्य शिबिर संपन्न
मुंबई:- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जनसेवेचे व्रत म्हणून सोमवार दि २७ जुलै २०२० रोजी काॅस्मोपोलीटन को. ऑप. हौ. सोसा. असोसिएशन व स्थानिक नगरसेवक माननीय श्री. राजू पेडणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीसाईबाबा मंदिर शेजारील व्यासपीठाजवळ मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात अनेकांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय तपासणी घेतली. त्यावेळी महत्वाच्या वेगवेगळ्या चाचण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
२७ जुलै २०२० रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या कालावधीत काॅस्मोपोलीटन को. ऑप. हौ. सोसा. असोसिएशनच्या आवारात श्रीसाईबाबा मंदिर शेजारील व्यासपीठाजवळ संपन्न झालेल्या मोफत आरोग्य शिबिरात • मोफत मलेरिया चाचणी, • मोफत कोविड-१९ एंटीजेन टेस्ट, • मोफत टि.बी. टेस्ट, • थर्मल फिवर स्क्रीनिंग, • ऑक्सी मीटर चेक अशा चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी सर्वांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली.
यावेळी स्थानिक नगरसेवक माननीय श्री. राजू पेडणेकर, शाखाप्रमुख गोविंद वाघमारे, सोसायटीचे अध्यक्ष श्री. प्रमोद मेडंण, सेक्रटरी श्री. मोहन सावंत, खजिनदार मुक्तार अहमद, श्रीमती नेहा गुप्ता, सौ. मुग्धा सावंत, श्री. सुनील, श्री मेहबूब पेवेकर, माजी नगरसेवक श्री जगमोहन कपूर साहेब तसेच इतर स्थानिक रहिवासी उपस्थित होते. अनेक रहिवाशांनी वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला.
सेक्रटरी श्री. मोहन सावंत यांनी स्थानिक नगरसेवक माननीय श्री. राजू पेडणेकर साहेबांचे आभार मानले. कोरोना महामारीच्या काळात अशाप्रकारे अतिशय नियोजन पद्धतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाल्याने अनेकांना त्याचा लाभ मिळाला. त्याबद्दल आयोजकांचे अनेकांनी आभार मानले.