दिल्ली विधानसभेचे निकाल जाहीर; दिल्लीत ‘आप’ चा धुवा उडाला
तब्बल २६ वर्षांनी भाजप सत्तेत
नवी दिल्ली:- दिल्ली विधानसभेचे निकाल जाहीर झाले असून भाजपने ४८ जागा जिंकून तब्बल २६ वर्षांनी सत्तेत प्रवेश केला. तर ‘आप’ एकूण २२ जागा जिंकू शकला. अरविंद केजरीवालांचा नवी दिल्ली मतदारसंघात ४ हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव करत परवेश वर्मा विजयी. मुख्यमंत्री आतिशी यांचा ३५२१ मताधिक्याने विजयी होऊन भाजपच्या रमेश भिधुरी ह्यांचा पराभव केला. काँग्रेससह इतर कोणत्याही पक्षास विजयाचे खाते उघडता आले नाही.
निवडणुकीत एकूण मतदानांपैकी मुख्य पक्षांना झालेले मतदान टक्केवारीसह पुढीलप्रमाणे:
भाजप: ४३,२३,११० – ४५.५६ %
आप: ४१,३३,८९८ – ४३.५७%
काँग्रेस: ६,०१,९२२ – ६.३४%
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत असतानाही दोन्ही पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. परिणामी याचा फटका दोन्ही पक्षास पडून पराभव पत्करावा लागला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘दिल्लीच्या निवडणुकीत इंडिया आघाडी असती तर भाजप पक्ष २० जागांच्या पुढेही गेला नसता’.
राहुल गांघींची दिल्ली निकालावर प्रतिक्रिया येताना म्हणाले, “आम्ही दिल्लीचा जनादेश स्वीकार करतो. दिल्लीतील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या योगदानासाठी आणि सर्व मतदारांना त्यांच्या समर्थनासाठी धन्यवाद. प्रदूषण, महागाई, भ्रष्टाचाराच्या विरोधात, दिल्लीची प्रगती व दिल्लीकरांच्या अधिकारांसाठीची ही लढाई अशीच चालू राहील”!
अरविंद केजरीवाल यांची पराभवावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, ” मी भाजपाला विजयासाठी शुभेच्छा देतो. मला आशा आहे की जनतेच्या विश्वासानुसार भाजपा काम करेल. गेल्या १० वर्षांत आम्ही खूर सारी कामं केली. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज अशा अनेक बाबतीत आम्ही कामं केली. दिल्लीतील पायाभूत सुविधाही सुधारण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू व आता आम्ही लोकांच्या सुख-दु:खात सोबत राहू.”

दिल्ली निवडणुकीत ‘मतिया महल’ येथून आपचे उमेदवार आले मोहम्मद इक्बाल यांनी सर्वाधिक मतांच्या फरकाने विजय मिळवत त्यांनी ४२७२४ इतक्या मताधिक्क्याने भाजपाच्या दीप्ती इंदोरा यांचा पराभव केला. तर सर्वात कमी मतांच्या फरकाने झालेला विजय हा भाजपाच्या चंदन कुमार चौधरी यांचा ठरला. त्यांनी संगम विहार येथे अवघ्या ३४४ मतांच्या फरकाने दिनेश मोहनिया या आपच्या उमेदवाराचा पराभव केला, त्यांना ५३७०५ इतकी मते मिळाली.